*Corona Virus (Covid - 19)प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी अन्न धान्य वितरीत करताना अवलंब वावयाची कार्यवाही*
◆ सर्वप्रथम माहे एप्रिल, मे व जून 2020 साठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत दिलेल्या अन्न धान्याचे त्या त्या महिन्यात वाटप करावे.
◆ तद्नंतर *प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत* देण्यात आलेल्या तांदळाचे लाभार्थ्यांना वितरण करावे. सदर तांदळाचे वाटप करताना त्या लाभार्थ्यांनी नियमित अन्नधान्याची उचल केली आहे याची खातरजमा करावी.
◆ अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील सदस्यांनादेखील प्रतिसदस्य प्रति माह 5 किलो याच परिमाणात मोफत अन्नधान्य वितरीत करावयाचे आहे. *उदा. अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या नियमित 35 किलो अन्नधान्याचे वितरण केल्यानंतर, सदर अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकेतील सदस्य संख्येनुसार प्रतिसदस्य 5 किलो तांदळाचे मोफत वितरण करावयाचे आहे. म्हणजेच अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकेवर 1 सदस्य असल्यास 5 किलो, 2 सदस्य असल्यास 10 किलो याप्रमाणे तांदळाचे मोफत वितरण करावयाचे आहे.*
◆ प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांनादेखील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या 5 किलो प्रति सदस्य या परिमाणात अन्नधान्य वितरण केल्यानंतर प्रति सदस्य 5 किलो तांदळाचे मोफत वितरण करावयाचे आहे.
◆ नागपूर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे वगळता इतर जिल्ह्यानी त्या-त्या जिल्ह्यांसाठी नियमितपणे विहित केलेल्या भारतीय अन्नमहामंडळाच्या गोदामामधून सदर मोफत तांदळाची उचल करावी.
0 टिप्पणियाँ