mukhyamantri mazi ladki bahin yojana : माझी लाडकी बहीण योजना नेमकी काय? या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण अर्ज करू शकतो आणि त्यासाठीची प्रक्रिया काय?

Mukhyamantri mazi adki bahin yojana 2024

महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना "घोषित केलेली आहे यामध्ये रुपये १५००/ महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही योजना याच महिन्यात चालू होणार आहे सदर योजना महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत राबवल्या जाणार आहे याच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे आहे माझी लाडकी बहीण योजना नेमकी काय? या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण अर्ज करू शकतो आणि त्यासाठीची प्रक्रिया काय? हेच समजून घ्या... (how to apply for mukhyamantri mazi ladki bahin yojana) ( mukhyamantri mazi ladki bahin yojana baddal mahiti 2024) 




यांना मिळणार Mukhyamantri mazi ladaki bahin yojna चा लाभ मिळणार? 


महाराष्ट्रातील 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना लाभ मिळणार. 

माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता 

1) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. 
2) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला. 
 3) कमीत कमी 21 वर्ष ते जास्तीत जास्त 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत अर्ज करता येणार. 
4) या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे नावाने बँक खाते असणे आवश्यक आहे. 
 5) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे,म्हणजे कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत असावे. 
6) रेशन कार्ड मध्ये लाभार्थी महिलेचे नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. 
 7) त्या महाराष्ट्रातील रहिवासी असल्याबाबतचे अधिवास सर्टिफिकेट 

योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण अपात्र? 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी काही अपात्रताही निश्चित करण्यात आल्या आहेत. अपात्रतेचे आठ निकष निश्चित करण्यात आले आहेत. ते खालील प्रमाणे... 
1) ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. 
2) ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. 
3) ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले अथवा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. 
4) सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपये जास्त लाभ घेतला असेल. 
5) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे. 
6) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत. 
7) ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे. 
8) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. 

 महत्वाचे __सर्वात पहिले अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आपली नोंदणी या योजनेअंतर्गत पुढील आठवड्यात सोमवार ते बुधवार पर्यंत १००%करून घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची नोंदणी सदर "नारी शक्ती दुत ॲप" मध्ये करून घेण्याची जबाबदारी अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. 

नोंदणी करत असताना माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे 

1) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज 
2) लाभार्थी महिलेचे आधार कार्ड 
3) महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्म दाखला. जन्माचा दाखला असावा /टि.सी झेरॉक्स असावी /डोमेसाईल प्रमाणात 
4) सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला. 
5) लाभार्थी नावाने बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत. 
6) पासपोर्ट आकाराचा फोटो 
7) शिधा पत्रिका (रेशन कार्ड) 
8) योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भरायचा? 

योजनेसाठी अर्ज पोर्टल, मोबाईल ॲप, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते. पण, ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही, त्यांच्याकरीता अंगणवाडी केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी, ग्रामीण, आदिवासी), ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. अशा ठिकाणी अर्ज प्रक्रिया करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आपल्याला घेता येईल. 

 सर्व माहिती ॲप मध्ये अंगणवाडी सेविका यांना भरावयाची आहे सोबत आधार कार्ड असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविकेला गावातील आशा वर्कर, सर्व बचत गटाच्या महिला यांना सुद्धा या योजनेबाबत योजनेबाबत माहिती देऊन "नारी शक्ती दुत"ॲप त्यांना प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून या योजने करता अर्ज करायला सांगावे. 
तसेच गावातील इतर पात्र असणाऱ्या 21 ते 60 वयोगटातील महिलांना सुद्धा आवश्यक कागदपत्र तयार करून गावातील सेतू केंद्रातून किंवा ग्रामसेवकांच्या माध्यमातून सदर योजने करता अर्ज किंवा माहिती भरणे बाबत जनजागृती अंगणवाडी केंद्रामध्ये सभा घेऊन "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत" वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी घ्यावी गावातील जेवढे ग्रुप असतील त्या सर्व ग्रुपमध्ये या योजनेबाबत माहिती टाकावी काही आवश्यकता असल्यास त्यांना बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संबंधित बीटच्या पर्यवेक्षिका यांचा मोबाईल नंबर देण्यात यावा, धन्यवाद!!

Recent Post


Read More

 

Read More

ई- पॉस - AEPDS Details

ई- पॉस - तांत्रिक अडचणी - Technical issue

iBkart - A Business Portal

Download



 

Recent Post

    एक टिप्पणी भेजें

    0 टिप्पणियाँ